Friday, October 7, 2022
HomeइतरUncategorizedआमदार अशोक पवार यांच्या एका फोनमुळे अपघातग्रस्ताचे नऊ लाख रुपये बिल माफ

आमदार अशोक पवार यांच्या एका फोनमुळे अपघातग्रस्ताचे नऊ लाख रुपये बिल माफ

सणसवाडी

हिवरे (ता. शिरूर) येथील बाजीराव मांदळे यांचा वाघोली येथे अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी बारा लाख वीस हजार रुपयाचे बिल आले होते. एवढ्या मोठ्या हाॅस्पिटलचा खर्च कसा करणार ही चिंता कुटूंबीयांना व नातेवाईकांना लागली होती.

सरपंच शारदा गायकवाड यांना ही बातमी कळताच त्यांनी हॉस्पिटल मध्ये धाव घेत मांदळे यांची भेट घेत काळजी करू नका असा धीर देत संबंधित घटनेची माहिती आमदार अशोक पवार यांच्या कानावर घ्यातल्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून हॉस्पिटल अधिकाऱ्याशी संपर्क साधात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत तब्बल नऊ लाख वीस हजार रुपये बील माफ करण्यात आले. ते स्वतः दोन दिवसांनी रुग्णाच्या भेटीला जाऊन विचार पूस करण्यात आले.

आमदार अशोक पवार यांच्या या कामगिरीमुळे मांदळे कुटूंबातील नातेवाईकबरोबरच हिवरे पंचक्रोशी सध्या त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या मदतीमुळे आजारापणाच्या कर्जाचा डोंगर झाल्या नसल्याची भावना मांदळे कुटूंबीयांनी बोलून दाखवली. त्यामुळे आमदार अशोक पवार आणि सरपंच शारदा गायकवाड यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!