आमदार अशोक पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान

0
807

तळेगाव ढमढेरे ( ता. २८ ऑगस्ट ) आमदार अशोक पवार यांच्या सुचवलेल्या योजनांचे संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्याने गोरगरीब जनतेला त्यांचा फायदा होत असून कोरोना काळातील समाजासाठी दिलेली सेवा ही खरी ओळख लोकनेत्यांची असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नसताना स्वराज्य उभं केले त्यासाठी मूठभर मावळे घेऊन बलाढ्य असा शक्तीला नामोहरण केले . यांसाठी त्यांचे कामाचे नियोजन आणि संयम खरचं वाखाण्यासारखा आहे. समोर आले ले संकटाला कुठलीही सबब न देता मात करणे हे ख-या आयुष्य जगण्याचे यमक आहे.

शिवचरित्राच्या माध्यमातून नागरिकांना मंत्रमुग्ध करताना प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील

आज अशोक पवार सर्वसामान्यांसाठी लढत आहे. क्षणभर ही न थांबण्याची सतत नाविन्यपूर्ण करण्याची त्यांची वृत्ती यामुळे मतदार संघात विकासाची गंगा वाहत आहे. वर्जावर सतत कोसळणारे पाण्याचा थेंब पडून ज्या प्रमाणे परिणाम होते त्याचप्रमाणे आपण आपले काम करत राहिले पाहिजे . मुंगी तिच्या आयुष्यात शिस्तीचे पालन करत जीवन जगत असते त्याचप्रमाणे आपण आपले आयुष्य जगले पाहिजे . महाराजांनी स्वतःचा संसार न करता स्वराज्यांची उभारणी करून एक आर्दश उभा केला . दिल्लीच्या पाशाहापुढे स्वराज्यांची मान न झुकता या महाराष्ट्राची शान राखून ठेवली.

शत्रूंचा मुकाबला करताना रयतेचे कुठलेही नुकसान होऊन न देता सीमेवरच रोखले . शेतक-यांच्या भाजीच्या देठाला न हात लावता सर्व जाती धर्मांचे स्थळे बरोबर महिलांच्या सुरक्षाचा विचार करणारा जाणता राजा झाले .म्हणून जात , पंथ , नाना विविध धर्मांना एक संध ठेवण्याचे सामर्थ्य या पुरुषात होते म्हणून रविंद्रनाथ टागोर यांना राष्ट्रपुरुष म्हणतात. शत्रूच्या नजरेत चारित्रशील राहणारा राजा म्हणून देखील शत्रूंनी दाखल घेतली.युध्दात एक चाल पुन्हा नाही एक माणूस पुन्हा नाही या निती मध्ये सर्वच लढाई तलवारीने नाही तर बुध्दीबळावर लढवल्या.आपल्या जीवनात जोडलेला माणूस जीवावर उधार होऊन स्वराज्यासाठी उभी करण्याची ताकद राजांकडे होती. स्वराज्याच्या कामी आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबांना वा-यावर न सोडता त्यांचे ते पोशिंदा झाले. सुराज्य लोककल्याणकारी राज्य राजांनी निर्माण केले.

आमदार अशोक पवार यांनी राबवलेल्या योजना जनहितासाठी महत्त्वाच्या आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात असा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितिन बानगुडे पाटील यांनी केले. यावेळी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचा केक कापून साजरा करण्यात आला . यावेळी आलेल्या नागरिकांसाठी जेवण्याची मेजवानी ठेवण्यात आली होती या कार्यक्रमांचे नियोजन आमदार अशोक बापू मित्र परिवारातील माऊली थेऊरकर , राहूल करपे अँड गणेश तोडकर , मंदार पवार , नवनाथ भुजबळ , राहूल भुजबळ , राकेश भुजबळ , निलेश मुळे , सुदर्शन तोडकर सागर भुजबळ , प्रशांत गायकवाड , बापूसो कापरे , सुनिल करपे यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील गिताई विष्णू मंगल कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी स्वत अशोक पवार हे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जमिनीवर बसून कार्यक्रम ऐकत एक आर्दश उभा केला.

या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी प्रास्ताविक राहुल करपे यांनी तर आभार प्रदर्शन भुजबळ यांनी केले. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here